महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

SRH vs RR : हैदराबादला जबर धक्का; हुकमी एक्काच झाला पुन्हा दुखापतग्रस्त - srh vs rr today match

हैदराबादचा हुकमी एक्का केन विल्यमसनला दुखापत झाली आहे. यामुळे तो राजस्थानविरुद्ध तो खेळू शकणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हैदराबादची वाटचाल आता बिकट झाली आहे. पण विल्यमसनच्या दुखापतीबाबत अद्याप पूर्ण माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, विल्यमसनची दुखापत फारशी गंभीर नाही.

IPL 2020: Who Among Holder Or Nabi Can Replace Injured Williamson In SRH's Playing XI For RR Game ?
SRH vs RR : हैदराबादला जबर धक्का; हुकमी एक्काच झाला पुन्हा दुखापतग्रस्त

By

Published : Oct 22, 2020, 4:53 PM IST

दुबई - आयपीएलच्या तेराव्या हंगामात आज राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात 'करा अथवा मरा', अशा स्थितीतील सामना होत आहे. या सामन्याला सुरूवात होण्याआधीच सनरायझर्स हैदराबादला एक मोठा धक्का बसला आहे. त्यांचा अत्यंत महत्त्वाच्या हुकमी खेळाडू सामन्याआधी दुखापतग्रस्त झाला आहे.

हैदराबादचा हुकमी एक्का केन विल्यमसनला दुखापत झाली आहे. यामुळे तो राजस्थानविरुद्ध तो खेळू शकणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हैदराबादची वाटचाल आता बिकट झाली आहे. पण विल्यमसनच्या दुखापतीबाबत अद्याप पूर्ण माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, विल्यमसनची दुखापत फारशी गंभीर नाही. मात्र असे असले तरी हैदराबाद संघ आपल्या या स्टार खेळाडूबाबत कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही.

केन विल्यमसनला कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात दुखापत झाली होती. या सामन्यानंतर वॉर्नरने, विल्ममसनला दुखापतीने ग्रासले असून त्याला धावताना त्रास होत असल्याचे सांगितले होते. विल्यमसन दुखापतीमुळे सुरूवातीच्या काही सामन्यांना मुकला होता. जर आता विल्ममसन खेळू शकला नाही, तर त्याच्या जागी अफगाणिस्तानचा अष्टपैलू मोहम्मद नबी याला अंतिम संघात स्थान मिळू शकते.

दरम्यान, आयपीएलच्या तेराव्या हंगामात, अनेक खेळाडू दुखापतग्रस्त होताना पाहावयास मिळत आहेत. यामुळे अनेक संघांना याचा फटकाही बसला आहे. यात हैदराबाद, दिल्ली, चेन्नई यांचे खेळाडूंना दुखापत झालेली आहे. इशांत शर्मा, अमित मिश्रा, ड्वेन ब्रोव्हा, भुवनेश्वर कुमार हे दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.

हेही वाचा -RR VS SRH : राजस्थान आणि हैदराबाद यांच्यात 'करा अथवा मरा' लढत

हेही वाचा -RCB vs KKR : बरे झाले, आम्ही नाणेफेक गमवली; कर्णधार विराटची सामन्यानंतर प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details