अबुधाबी - ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू हे स्लेजिंग करण्यात माहीर असल्याचे म्हटले जाते. पण आता यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावाची देखील भर पडली आहे. विराटने शुक्रवारी हैदराबादविरुद्ध झालेल्या आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात हैदराबादचा फलंदाज मनीष पांडेला डिवचण्याचा प्रयत्न केला. याचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे.
एलिमिनेटर सामन्यात बंगळुरूने प्रथम फलंदाजी केली आणि २० षटकामध्ये ७ विकेट गमावत १३१ धावा केल्या. १३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या संघाची सुरुवातही खराब झाली. श्रीवत्स गोस्वामी स्वस्तात बाद झाल्यानंतर मनीष पांडे आणि वॉर्नर जोडीने संघाचा डाव सावरला. वॉर्नर-पांडे जोडी मैदानावर स्थिरावल्यानंतर बंगळुरुच्या संघावरचे दडपण वाढले. तेव्हा विराटने मनीष पांडेला स्लेजिंग करत उकसवण्याचा प्रयत्न केला.
नेमके काय घडले
मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर फलंदाजी करत असलेल्या मनिष पांडेला विराट कोहलीने स्लेजिंग करत, आज नही मारेगा शॉट? अशी शेरेबाजी केली.
मनीषचे बॅटने उत्तर...