आबूधाबी - मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलच्या १३ व्या हंगामासाठी जोरदार तयारी करत आहे. या तयारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सकडून शेअर केले जात आहेत. दोन दिवसांपूर्वी रोहित शर्माचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. आता आणखी एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत गोलंदाज वेगवान चेंडू टाकत स्टंम्पचे तुकडे केल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबईचा महत्वाचा अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगाने आयपीएलमधून माघार घेतली. असे असले तरी मुंबई संघात एकापेक्षा एक खेळाडू आहेत. या वर्षी न्यूझीलंडचा जलद गोलंदाज ट्रेंट बोल्ट मुंबईकडून खेळताना दिसेल. त्यामुळे मलिंगाची कमतरता जाणवणार नाही. बोल्टने संघासोबत सरावाला सुरूवात केली असून याचा व्हिडिओ मुंबईने शेअर केला आहे.
व्हिडिओत बोल्ट वेगवान चेंडू टाकत स्टंम्पचे दोन तुकडे केल्याचे पाहायला मिळाले. हा व्हिडिओ शेअर करताना मुंबईने म्हटले आहे की, क्लिन बोल्ट, ट्रेट आला आहे.