दुबई - मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत आरसीबीने सुपर ओव्हरमध्ये बाजी मारली. आरसीबीच्या या विजयानंतर गुणातालिकेमध्ये मोठे बदल झालेला पाहायला मिळाला. वाचा काय झाले बदल.
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्याआधी आरसीबीचा संघ सातव्या क्रमाकांवर होता. कारण आरसीबीने मुंबईविरुद्धच्या सामन्याआधी दोन सामने खेळले होते. त्यात पहिला सामना जिंकला होता, तर दुसऱ्या सामन्यात त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. नेट रनरेटमुळे ते सातव्या स्थानी होते. पण या विजयानंतर आरसीबीने थेट तिसऱ्या स्थानावर धडक मारली आहे. कारण या विजयानंतर आरसीबीचे चार गुण झाले असून त्यांनी तिसरे स्थान पटकावले आहे.
मुंबईने आरसीबीविरुद्धच्या सामन्याआधी विजय मिळवला होता. त्यामुळे मुंबईचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर होता. पण या सामन्यात मुंबईचा पराभव झाला. त्यामुळे आतापर्यंतच्या तीन सामन्यांमध्ये मुंबईला दोन पराभवांचा सामना करावा लागला असून त्यांच्या नावावर फक्त एक विजय आहे. आरसीबीविरुद्धच्या सामन्यानंतर मुंबईचा संघ २ गुणांसह पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.