दुबई - आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सचा पराभव केला, यानंतर मुंबईचा संघ प्ले ऑफमध्ये क्वालिफाय होणारा पहिला संघ ठरला. सीएसकेचा संघ यापूर्वीच स्पर्धेतून बाहेर पडला आहे. मुंबई क्वालिफाय झाल्यामुळे आता उर्वरित तीन स्थानांसाठी सहा संघामध्ये चुरस आहे. त्यातच शुक्रवारी पंजाबचा राजस्थानने पराभव केला. पंजाबच्या या पराभवामुळे उर्वरित सर्वच संघांना प्ले ऑफमध्ये पोहचण्याच्या आशा जिवंत राहिल्या आहेत. पंजाबच्या पराभवाचा सर्वाधिक फायदा कोलकाता, राजस्थान आणि हैदराबाद या संघांना झाला आहे.
क्वालिफायचे तिकीट कोणाला?
आयपीएलच्या १३ व्या हंगामात आतापर्यंत ५० सामने झाले आहेत. आज ५१वा सामना मुंबई आणि दिल्ली यांच्यात खेळला जाणार आहे. बाद फेरीतील फक्त सहा सामने बाकी आहेत. तरी देखील अद्याप अंतिम चार संघ कोणते हे स्पष्ट झालेले नाही. मुंबई वगळता एकाही संघाचे क्वालिफायचे तिकिट पक्के झालेले नाही. अशातच सहा सामने, सहा संघ आणि तीन जागा असे गणित सद्यघडीला आहे.
...तर नेट रनरेटच्या आधारावर संघ ठरतील पात्र