अबुधाबी - विराट कोहली नेतृत्वात खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर बंगळुरूने कोलकाता नाइट रायडर्सचा दारूण पराभव करत गुणतालिकेत मोठे फेरबदल केले. बंगळुरूच्या विजयाने मुंबईला गुणतालिकेत धक्का बसला आहे. पाहा, आरसीबीच्या विजयानंतर गुणतालिकेत नेमके काय बदल झाले...
कोलकाता विरूद्धच्या सामन्यापूर्वी बंगळुरूचा संघ तिसऱ्या स्थानावर होता. त्यांनी नऊ सामने खळले होते. या नऊ सामन्यांमध्ये बंगळुरूने सहा सामन्यांमध्ये विजय मिळवला होता, तर त्यांना तीन सामन्यांमध्ये पराभवही पत्करावा लागला होता. कोलकाता विरुद्धचा सामना सहज जिंकत बंगळुरूने गुणतालिकेत मुंबई इंडियन्सला धक्का दिला. कारण या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा संघ हा १२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर होता. पण आजच्या सामन्यात दोन गुण पटकावल्यामुळे बंगळुरूचे १४ गुण झाले आहेत. त्यामुळे १४ गुणांसह बंगळुरूने गुणतालिकेत मुंबईला धक्का देत दुसरे स्थान पटकावले आहे. त्यामुळे मुंबईच्या संघाची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.