दुबई - मुंबई इंडियन्सने शुक्रवारी कोलकाता नाइट रायडर्सचा पराभव करत गुणतालिकेत अव्वल स्थान पुन्हा काबीज केले. मुंबईने दिल्लीला धक्का देत हे अव्वलस्थान पटकावले. मुंबईच्या संघाने आठ सामन्यात सहा विजय मिळवले आहेत. १२ गुणांसह मुंबईचा संघ अव्वल स्थानावर आहे.
आयपीएल तेरावा हंगाम अर्धा संपला असून स्पर्धेने उत्तरार्धाकडे आगेकूच केली आहे. पहिल्या चार स्थानासाठी आठ संघात चूरस निर्माण होणार आहे. पण सद्य घडीला मुंबईचा संघ अव्वलस्थानी आहे. तर दुसऱ्या स्थानावर दिल्लीचा संघ आहे. यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर अनुक्रमे बंगळुरू आणि कोलकाताचा संघ आहे. पाचव्या स्थानावर हैदराबादचा संघ आहे. चेन्नई सहाव्या स्थानी आहे. राजस्थानचा संघ सातव्या तर पंजाबचा संघ तळाशी आठव्या स्थानी आहे.