महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

वाचा कोण आहे 'ऑरेंज' आणि 'पर्पल' कॅपचा मानकरी - ऑरेंज कॅप आयपीएल २०२० न्यूज

दिल्लीचा वेगवान गोलंदाज कगिसो रबा़डाने आपल्याकडे 'पर्पल कॅप' राखली आहे. तर, किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने लीगमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत.

ipl 2020 orange cap and purple cap holders
वाचा कोण आहे 'ऑरेंज' आणि 'पर्पल' कॅपचा मानकरी

By

Published : Oct 12, 2020, 2:53 PM IST

नवी दिल्ली -आयपीएलमध्ये रविवारी रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. या सामन्यानंतर दिल्लीचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने आपल्याकडे 'पर्पल कॅप' राखली आहे. मुंबईविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात रबाडाने २६ धावांत दोन गडी बाद केले. यासह त्याच्या बळींची संख्या १७ झाली आहे. या सामन्यात मुंबईने पाच गडी राखून विजय मिळवला.

रबाडापाठोपाठ मुंबईचा जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट आहे. दोघांच्या नावावर प्रत्येकी ११ बळी आहेत. लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला 'ऑरेंज कॅप' देण्यात येते. तर, सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाला 'पर्पल कॅप' देण्यात येते.

चालू हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने सर्वाधिक धावा केल्या आहेत. राहुलने सात सामन्यांत ३८७ धावा केल्या आहेत. या यादीमध्ये दुसर्‍या क्रमांकावर मयंक अग्रवाल असून त्याच्या खात्यात ३३७ धावा आहे. पंजाबने सात सामन्यात सहा पराभव पत्करले आहेत. आयपीएलच्या गुणतालिकेबद्दल सांगायचे झाले तर, मुंबईचा संघ १० गुणांसह पहिल्या तर, पंजाबचा संघ २ गुणांसह शेवटच्या स्थानावर आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details