महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL २०२० : सामन्याआधी वडिलांचे निधन, दुःख विसरुन उतरला सलामीला - हैदराबाद वि. पंजाब न्यूज

मनदीपचे वडील आजारी होते. त्यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. अशात पंजाबचा सलामीवीर मयांक अग्रवाल मागील सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. यामुळे मनदीपवर सलामीची जबाबदारी होती. ती जबाबदारी ओळखून मनदीपने वडिलांचे दु:ख मनात ठेऊन केएल राहुलसोबत सलामीला उतरला.

ipl 2020 kings xi punjab mandeep singh opens after his father demise
IPL २०२० : सामन्याआधी वडिलांचे निधन, दुःख विसरुन उतरला सलामीला

By

Published : Oct 25, 2020, 2:58 PM IST

दुबई - आयपीएल २०२० मध्ये शनिवारी झालेल्या ४३व्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबच्या मनदीप सिंहने सलामीला येत भलेही छोटी खेळी साकारली. पण त्याचीच चर्चा सद्या सर्वत्र होत आहे. सकाळी मनदीपच्या वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात झाले आणि तो सायंकाळी मैदानात उतरला.

मनदीपचे वडील आजारी होते. त्यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. अशात पंजाबचा सलामीवीर मयांक अग्रवाल मागील सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. यामुळे मनदीपवर सलामीची जबाबदारी होती. ती जबाबदारी ओळखून मनदीपने वडिलांचे दु:ख मनात ठेऊन केएल राहुलसोबत सलामीला उतरला.

किंग्ज इलेव्हन पंजाबने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यामुळेच पंजाबचे खेळाडू काळ्या फीत घालून मैदानात उतरले होते.

दरम्यान मनदीप या सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. १४ चेंडूत १७ धावा करत मनदीप बाद झाला. पंजाबच्या इतर फलंदाजांनीही या सामन्यात निराशा केली. तेव्हा निकोलस पूरनने अखेरपर्यंत लढा देऊन संघाला १२६ धावांचा टप्पा गाठून दिला आणि पंजाबच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत हैदराबादच्या तोंडातून विजय हिसकावून आणला. पंजाबने हा सामना १२ धावांनी जिंकला.

हेही वाचा -KKR vs DC : चक्रवर्ती-कमिन्सच्या माऱ्यासमोर दिल्ली नेस्तनाबूत, कोलकाताचे स्पर्धेतील आव्हान कायम

हेही वाचा -#IPL2020 : पंजाबच 'किंग'; हैदराबादवर १२ धावांनी मात

ABOUT THE AUTHOR

...view details