महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, 'हा' मुख्य खेळाडू आयपीएलमधून बाहेर - जोप्रा आर्चर

आयपीएलच्या १३ व्या हंगामाला मार्चच्या शेवटी सुरुवात होणार आहे. याआधीच राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा स्टार वेगवान गोलंदाज जोप्रा आर्चर दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे.

ipl 2020 :  Jofra Archer suffers injury setback and is ruled out of Sri Lanka tour and IPL
राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, 'हा' मुख्य खेळाडू आयपीएलमधून बाहेर

By

Published : Feb 6, 2020, 4:13 PM IST

Updated : Feb 6, 2020, 4:28 PM IST

लंडन- आयपीएलच्या १३ व्या हंगामाला मार्चच्या शेवटी सुरुवात होणार आहे. याआधीच राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा स्टार वेगवान गोलंदाज जोप्रा आर्चर दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे.

२४ वर्षीय जोप्राला मागील महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात उजव्या हाताच्या कोपरऱ्याला दुखापत झाली होती. यामुळे आर्चर संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला होता.

जोप्रा आर्चर

बुधवारी त्यांच्या हाताचा स्कॅन करण्यात आला. तेव्हा ही दुखापत गंभीर असल्याचे दिसून आले. जोप्राला या दुखापतीतून सावरण्यासाठी ३ महिन्याचा अवधी लागेल, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आलं.

इंग्लंडचा संघ मार्च महिन्यात श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या दौऱ्यातूनही आर्चर बाहेर पडला आहे.

दरम्यान, आर्चरने आतापर्यंत राजस्थान रॉयल्स संघासाठी दोन हंगाम खेळले आहेत. या दोनही हंगामात आर्चरने महत्वपूर्ण कामगिरी नोंदवली. आर्चरने आयपीएलच्या २१ सामन्यात २६ गडी बाद केले होते.

हेही वाचा -'किंग' कोहली : व्यवसायातही सुपरहिट; अक्षय, सलमानसह शाहरुखला टाकले मागे

हेही वाचा -पहिल्या एकदिवसीय सामन्यात 'या' कारणाने झाला पराभव, विराटचे विश्लेषण

Last Updated : Feb 6, 2020, 4:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details