कोलकाता- इंडियन प्रीमियर लीग (आईपीएल) २०२० मधील हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव कोलकातामध्ये पार पडला. या लिलावात ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस लिनवर मोठी बोली लागली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सने त्याला २ कोटींच्या बोलीवर आपल्या संघात सामील करुन घेतले.
गेल्या हंगाम कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणारा लिन आता आगामी २०२० च्या १३ व्या हंगामात मुंबईकडून खेळताना दिसेल. या बोलीनंतर लिनने ट्विटर करत नवीन हंगामासाठी आपण सज्ज असल्याचं म्हटलं आहे.