महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

दिग्गजाने निवडला IPLचा सर्वोत्तम संघ; रोहित, विराट आणि राहुलला स्थान नाही - आगरकरच्या संघात विराट, रोहितला स्थान नाही

भारताचा माजी गोलंदाज अजित आगरकरने आयपीएल २०२० मधील आपला सर्वोत्कृष्ट संघ निवडला आहे. यात त्याने महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा, के एल राहुल, राशिद खान आणि विराट कोहलीसारख्या दिग्गज खेळाडूंना आपल्या संघात घेतलेले नाही.

IPL 2020 Ajit Agarkar names his best XI of the season, doesn't pick KL Rahul as the opener
दिग्गजाने निवडला IPL च्या सर्वोत्तम संघ; रोहित, विराट आणि राहुलला स्थान नाही

By

Published : Nov 14, 2020, 3:38 PM IST

मुंबई - आयपीएलचा तेरावा हंगाम काही दिवसांपूर्वीच पार पडला आहे. मुंबई इंडियन्सने दिल्लीचा पराभव करत ही स्पर्धा जिंकली. दरम्यान, आयपीएल संपल्यानंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी, आपल्या आवडीचा आयपीएल २०२० चा सर्वोत्तम संघ जाहीर केला आहे. यामध्ये भारताचा माजी खेळाडू अजित आगरकर याचाही समावेश झाला आहे.

अजित आगरकरने त्याच्या आवडीच्या संघात महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा, के एल राहुल, राशिद खान आणि विराट कोहलीसारख्या दिग्गज खेळाडूंना घेतलेले नाही.

आगरकर याने निवडलेला असा आहे संघ -

आगरकरने डेव्हिड वॉर्नर आणि शिखर धवन यांची सलामीवीर म्हणून निवड केली आहे. तिसऱ्या क्रमांकावर त्याने इशान किशानला पसंती दिली आहे. तर चौथ्या स्थानावर सूर्यकुमार यादवची निवड केली आहे. पाचव्या स्थानावर आरसीबीचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलिअर्सची निवड केली आहे. अष्टपैलू म्हणून हार्दिक पांड्या आणि मार्कस स्टॉयनिस यांची निवड केली. कागिसो रबाडा आणि बुमराह यांच्यावर वेगवान गोलंदाजीची धुरा आगरकरने सोपवली आहे. तर युजवेंद्र चहल आणि वरुण चक्रवर्ती यांच्यावर फिरकीची धुरा आगरकरच्या संघाची आहे.

असा आहे आगरकरचा सर्वोत्तम आयपीएल संघ -

डेव्हिड वॉर्नर, शिखर धवन, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, एबी डिविलियर्स, हार्दिक पांड्या, मार्कस स्टॉयनिस, जसप्रीत बुमराह, कगिसो रबाडा, युजवेंद्र चहल आणि वरुण चक्रवर्ती.

हेही वाचा -Happy Diwali २०२०: विराट कोहली, रहाणेसमवेत देशी-विदेशी खेळाडूंनी दिल्या दीपोत्सवाच्या शुभेच्छ

हेही वाचा -Ind Vs Aus : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा; पुकोस्वकीसह युवा खेळाडूंना संधी

ABOUT THE AUTHOR

...view details