दुबई -गतविजेत्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामात आपला तडाखेबंद फॉर्म कायम राखला. त्यांनी साखळी फेरीत ९ विजयासह १८ गुणांची कमाई करत गुणतालिकेत अव्वलस्थान कायम राखले. तसेच क्वालिफायर सामन्यात त्यांनी दिल्लीचा एकतर्फी पराभव करत थाटात अंतिम फेरी गाठली. याआधी मुंबईने आयपीएलचे चार वेळा विजेतेपद पटकावले आहे. पाचव्या विजेतेपदासाठी त्यांची दिल्ली कॅपिटल्सशी झुंज आहे. दिल्ली प्रथमच अंतिम फेरीत पोहोचली असून ते पहिल्या जेतेपदासाठी उत्सुक आहेत. दिल्लीच्या जेतेपदाच्या वाटेत मुंबईचे 'हे' पाच खेळाडू अडसर ठरू शकतात. जाणून घ्या कोण आहेत ते खेळाडू आणि त्यांची कामगिरी...
इशान किशन
मुंबईचा फलंदाज इशान किशनने तेराव्या हंगामात सातत्याने धावा केल्या आहेत. त्याने १३ सामन्यांत ४८३ धावा केल्या असून तो सर्वात जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या स्थानी आहे.
जसप्रीत बुमराह
यॉर्कर किंग अशी ओळख असलेल्या जसप्रीत बुमराहने तेराव्या हंगामात विरोधी संघातील खेळाडूंच्या मनात दहशत निर्माण केली आहे. त्याने १४ सामन्यांत भेदक मारा करत २७ गडी बाद केले आहेत. सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत बुमराह दुसऱ्या स्थानी आहे.
ट्रेंट बोल्ट