चेन्नई - आयपीएलच्या १२ व्या पर्वास उद्यापासून (शनिवार) सुरूवात होत आहे. विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांच्या संघात पहिला सामना रंगेल. या सामन्यात विराट कोहली नव्या विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरेल.
विराट एकाच संघाकडून आयपीएलचे ११ सीजन खेळला आहे. आयपीएलची सुरुवात २००८ साली झाली तेव्हा बंगळुरूच्या संघाने त्याला विकत घेतले. तेव्हापासून तो सलग ११ सीजन या संघाकडून खेळला आहे. आयपीएलमध्ये अनेक खेळाडू दुसऱ्या संघात खेळताना दिसून आले. उद्याच्या सामन्यात विराट खेळला तर विराट सलग १२ वर्ष एकाच संघाकडून खेळण्याचा विक्रम त्याच्या नावावर करणार आहे.