दुबई - ऑस्ट्रेलियामध्ये २१ फेब्रुवारीपासूनहोणाऱ्या आयसीसी महिला टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारताच्या जी.एस.लक्ष्मी या मॅच रेफरी असणार आहेत. या स्पर्धेत मॅच रेफरीची भूमिका साकारणाऱया लक्ष्मी या पहिल्या महिला ठरल्या आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी सामना अधिकाऱयांची घोषणा केली. यातील तीन रेफरींमध्ये लक्ष्मी या एकमेव महिला आहेत. या स्पर्धेसाठी १२ पंचही नियुक्त केले गेले आहेत.
हेही वाचा -क्रिकेट खेळण्यासाठी संगकारा पाकिस्तानात जाणार, संघाचं करणार नेतृत्व
२२ फेब्रुवारी रोजी पर्थच्या वाका स्टेडियमवर रंगणाऱ्या वेस्ट इंडिज आणि थायलंड सामन्यात लक्ष्मी या अधिकृत मॅच रेफरी असतील. आठ संघांच्या या स्पर्धेत लक्ष्मी यांच्या व्यतिरिक्त इतर महिला लॉरेन एगेनबॅग, किम कॉटन, क्लेअर पोलोसॅक, स्यू रेडफरन आणि जॅकलिन विल्यम्स या सामना अधिकारी आहेत.