महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

सुषमा स्वराज यांचे निधन, वीरेंद्र सेहवागसह खेळाडूंनी वाहिली श्रध्दांजली - sushma swaraj NEWS

भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे काल (मंगळवारी ) दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले. स्वराज यांच्या मृत्यूची बातमी समजताच, सोशल मीडियावर श्रध्दांजलीच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत. क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनीही सोशल मीडियावर स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली.

सुषमा स्वराज यांचे निधन, वीरेंद्र सेहवागसह खेळाडूंनी वाहिली ट्विट करत श्रध्दांजली

By

Published : Aug 7, 2019, 8:47 AM IST

Updated : Aug 7, 2019, 9:10 AM IST

नवी दिल्ली - भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे काल (मंगळवारी ) दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दुःखद निधन झाले. स्वराज यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या मृत्यूसमयी 67 वर्षांच्या होत्या. भारतीय जनता पक्षातील जेष्ठ नेत्या म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्य निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशभरातील अनेक पक्षाच्या नेत्यांनी दुःख व्यक्त केले.

सुषमा स्वराज यांच्या मृत्यूची बातमी समजताच, सोशल मीडियावर श्रध्दांजलीच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत. क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनीही सोशल मीडियावरून स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली. स्वराज्य यांच्य मृत्यूची दुर्दैवी बातम्या ऐकून अनेक माजी क्रिकेटपटू आणि इतर क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनी ट्विट केले.

Last Updated : Aug 7, 2019, 9:10 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details