नवी दिल्ली -इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये लिलाव होतो, तेव्हा क्रिकेट जगतातील मोठी नावे नेहमीच चर्चेत असतात. या वेळीसुद्धा ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल आणि बरेच परदेशी खेळाडू लिलावानंतर चर्चेत आहेत. एकीकडे फ्रँचायझींनी परदेशी खेळाडूंसाठी मोठी रक्कम मोजली असली तरी त्यांनी भारतीय युवा क्रिकेटपटूंकडे दुर्लक्ष केलेले नाही.
हेही वाचा -कटक वनडेपूर्वी कोहली कंपनीने घेतला ब्रेक, पाहा काय करताहेत तुमचे आवडते खेळाडू?
कोलकातामध्ये झालेल्या या लिलावासाठी ९७१ खेळाडूंनी नोंदणी केली होती. यातील ३३२ खेळाडूंना बीसीसीआयने निवडले होते. मात्र, गुरुवारी या यादीत आणखी सहा खेळाडूंची नावे समाविष्ट करण्यात आली. यामुळे ३३२ ऐवजी ३३८ खेळाडूंवर बोली लागली. त्यामध्ये भारताचे खालील युवा खेळाडू नशीबवान ठरले आहेत. -
यशस्वी जयस्वाल -
१७ वर्षाच्या यशस्वी जयस्वालने यंदाच्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्याने मुंबईकडून खेळताना झारंखंड विरूद्ध द्विशतक ठोकले होते. राजस्थान रॉयल्सने यशस्वीला २.४ कोटी रुपयांची बोली लावून संघात घेतले आहे.
प्रियम गर्ग -
१९ वर्षांखालील संघाचा कर्णधार प्रियम गर्गही या लिलावात मागे राहिला नाही. बेस प्राईस २० लाख असणाऱ्या प्रियमसाठी सनरायझर्स हैदराबादने १.९० कोटींची बोली लावून संघात घेतले.
वरुण चक्रवर्ती -