मुंबई - भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. उभय संघातील या दौऱ्यात एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्याची मालिका खेळवण्यात येणार आहे. एका क्रीडा संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय संघाचा हा दौरा १६ जूनपासून सुरू होणार आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी या वर्षाच्या सुरूवातीला भारतीय महिला संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे, असे ट्विट करून सांगितलं होतं. २०१४ नंतर प्रथमच भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. भारतीय संघाने २०१४ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. या नंतर अद्याप भारतीय महिला संघाने कसोटी सामना खेळलेला नाही.
इंग्लंड अॅन्ड वेल्स क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या दौऱ्याबाबत सांगितलं की, 'आम्ही भारत-इंग्लंड यांच्यातील मालिकेबाबत उत्साहित आहोत.'