नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याच्याशी संवाद साधला. या संवादादरम्यान विराटने आपल्या वडिलांनी दिलेल्या सल्ल्याची आठवण काढली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही (आयसीसी) विराटचे विधान ट्विट केले आहे.
छेत्रीशी बोलताना विराट म्हणाला, "माझ्या वडिलांनी मला स्पष्ट सांगितले होते की तुम्ही खेळताना अभ्यास करायचा आहे. जर तुम्ही 200 टक्के आत्मविश्वासाने म्हणाल की तुम्ही खेळात करिअर करू शकता तर तुम्ही पूर्णपणे सक्षम आहात. तेव्हा तुम्ही खेळावरच लक्ष केंद्रित करू शकता." विराट 18 वर्षांचा असताना त्याचे वडील प्रेम कोहली यांचे निधन झाले होते.