नवी दिल्ली - भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने प्रशिक्षण सुरू केले आहे. कोरोनाव्हायरसमुळे मोठी विश्रांती घेतल्यानंतर इशांतने सरावाला सुरूवात केली. इशांतने सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून ही माहिती दिली.
इशांत म्हणाला, "मी स्वत: ला सकारात्मकतेमध्ये व्यस्त ठेवले आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सराव केला." व्हिडिओमध्ये इशांत काही फिटनेस ड्रिल करताना दिसत आहे. इशांतपूर्वी भारतीय संघाचा कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारानेही सराव सुरू केला होता. इशांत आणि पुजारा हे दोघेही भारताच्या कसोटी संघाचे महत्त्वपूर्ण भाग आहेत.