ठाणे- आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेतील महामुकाबला समजला जाणारा भारत विरुध्द पाकिस्तान सामना सध्या सुरू आहे. या सामन्याचा आनंद घेण्यासाठी भारतासह ठाणेकरही इंग्लडच्या मँन्चेस्टर येथे दाखल झाले आहेत. मैदानावरच ठाण्यातील प्रेक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असलेला भगवा फडकवला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे बॅनर झळकावले. महत्वाचे म्हणजे, ठाण्यातील दिवा येथील प्रेक्षक आगरी-कोळी टोपी परिधान करत मैदानावर सामन्याचा आनंद घेत आहेत.
WC २०१९ : भारत-पाक सामन्यादरम्यान झळकले 'हिंदुस्थान के दो शेर' - banner
आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेतील महामुकाबला समजला जाणारा भारत विरुध्द पाकिस्तान सामना सध्या सुरू आहे. या सामन्याचा आनंद घेण्यासाठी भारतासह ठाणेकरही इंग्लडच्या मँन्चेस्टर येथे दाखल झाले आहेत. मैदानावरच ठाण्यातील प्रेक्षकांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे बॅनर झळकावले.
भारत विरुध्द पाकिस्तान या संघातील सामना पाहण्यासाठी जगभरातील प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतात. या सामन्याच्यी तिकीटाच्या किंमतीही लाखोंच्या घरात असतात. आज सुरू असलेला सामना पाहण्यासाठी ठाणे दिवा येथील संदेश भगत, राहुल पाटील आणि निलेश भोईर हे इंग्लडच्या मँन्चेस्टर मैदानावर गेले आहेत.
या रसिक प्रेक्षकांनी मैदानावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो असलेल्या बॅनर झळकवला. त्यांनी झळकावलेल्या बॅनरवर 'हिंदुस्थान के दो शेर' असं लिहिण्यात आले आहे.