गुवाहाटी - भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघात खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंडने ४१ धावांनी भारताचा पराभव केला. या विजयासह इंग्लंडने ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. हा सामना आसाम राज्यातील गुवाहाटी येथील बर्सापारा क्रिकेट मैदानावर खेळला गेला.
पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा पराभव; इंग्लंडची मालिकेत १-० ने आघाडी - WON
पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंडचा भारतावर विजय
पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून इंग्लंड संघाला प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केले. इंग्लंडकडून डॅनिएल वेट (३५), कर्णधार हीदर नाइट (४०) आणि टॅमी ब्युमाँट (६२) यांनी केलेल्या शानदार खेळींच्या जोरावर इंग्लंडने भारतासमोर ४ विकेट गमावत १६१ धावांचे आव्हान ठेवले.
इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना एकाही भारतीय फलंदाजाला आपल्या नावाला साजेशी खेळी करता आली नाही. भारताकडून तळाच्या फलंदाज शिखा पांडेने सर्वाधिक २३ धावा केल्या तर दीप्ती शर्मा २२ धावा करत भारताची धावसंख्या १०० पार पोहचवली. धावांचा पाठलाग करताना निर्धारीत २० षटकांमध्ये भारतीय संघ ६ विकेट्स गमावत फक्त ११९ धावा करू शकला.