गयाना- वेस्ट इंडिजने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी १३ सदस्यांचा संघ शनिवारी जाहीर केला आहे. या संघात अनुभवी स्फोटक फलंदाज ख्रिस गेलला जागा देण्यात आलेली नाही. तर ६ फूट ५ इंच उंच असलेल्या रहकीम कोर्नवॉल याला संघात स्थान देण्यात आले आहे. दरम्यान, वेस्ट इंडिजचा संघ भारत विरुध्द दोन कसोटी सामने खेळणार आहे.
वेस्ट इंडिजच्या कसोटी संघात स्थान मिळवलेला कोर्नवॉल याने ५५ प्रथम श्रेणी सामने खेळली आहेत. यात त्याने २३.९० च्या सरासराने २६० गडी बाद केले आहेत.
भारत विरुध्द वेस्ट इंडिज संघामध्ये पहिला कसोटी सामना २२ ते २६ ऑगस्ट या दरम्यान, सर व्हिव्हियन रिचर्ड मैदान अॅटिग्वा येथे रंगणार आहेत. तर दुसरा आणि अखेरचा सामना, ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या दरम्यान सबिना पार्क जमैका येथे रंगणार आहे.
वेस्ट इंडिजचा संघ -
जेन होल्डर ( कर्णधार ), शामार्ह ब्रुक्स, जॉन कॅम्बेल, क्रेग ब्रॅथवेट, डॅरेन ब्राव्हो, रोस्टन चेस, शॅनोन गॅब्रीएल, शिमरोन हेटमायर, शाय होप, राहकीम कोर्नवॉल, शेन डॉवरीच, केमार रोच, किमो पॉल.
भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, के.एल. राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव.