बंगलुरु- एम. चिन्नास्वामी मैदानावर तिसरा अखेरचा टी-२० सामना होणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडिया मालिकेवर २-० असे निर्वादीत वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करेल. असे घडल्यास, टीम इंडिया पहिल्यादांच आफ्रिकेविरुध्द मायदेशात पहिली टी-२० मालिका जिंकेल.
India vs South Africa : अखेरच्या सामन्यासह मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया आतूर - टीम इंडिया विषयी बातमी
धर्मशाला येथे पहिला सामना पावसात वाहून गेला. त्यानंतर मोहालीतील दुसरा सामना टीम इंडियाने ७ गडी राखून जिंकला आणि मालिकेत १-० ने आघाडी मिळविली. अखेरचा सामना जिंकून मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया आतूर आहे. टीम इंडियाने टी-२० मालिका जिंकली तर कसोटी मालिकेआधी संघाची मानसिक तयारीही मजबूत होईल.
तत्पूर्वी धर्मशाला येथे पहिला सामना पावसात वाहून गेला. त्यानंतर मोहालीतील दुसरा सामना टीम इंडियाने ७ गडी राखून जिंकला आणि मालिकेत १-० ने आघाडी मिळविली. अखेरचा सामना जिंकून मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया आतूर आहे. टीम इंडियाने टी-२० मालिका जिंकली तर कसोटी मालिकेआधी संघाची मानसिक तयारीही मजबूत होईल.
हेही वाचा -विजय हजारे चषक : क्रृणाल पांड्याला मिळाले बडोदा संघाचे कर्णधारपद
या सामन्यात ऋषभ पंत याच्या कामगिरीकडे पुन्हा एकदा लक्ष असेल. दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजानी धारदार गोलंदाजी करत आफ्रिकेच्या युवा फलंदाजांना अडचणीत आणले होते. वॉशिंग्टन सुंदर आणि नवदीप सैनीने तर आफ्रिकेच्या फलंदाजांची चांगलीच कोंडी केली होती. यामुळे अखेरच्या सामन्यातही टीम इंडियाचे पारडे जड आहे.