१६ जूनला विश्वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तानविरुद्ध खेळणार? - icc
आयसीसी विश्वचषक स्पर्धेत १६ जूनला इंग्लंडच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळण्यात येणार आहे.
नवी दिल्ली- पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत-पाक यांच्यातील क्रिकेटची लढत हा चाहत्यांसाठी एक थरारक अनुभव असतो. तो सामना विश्वचषक स्पर्धेतील असेल तर मग क्रिकेट चाहत्यांसाठी एक पर्वणीच ठरते. असाच एक भारत-पाक यांच्यातील 'हाय व्होल्टेज' सामना आगामी आयसीसी विश्वचषक स्पर्धेत १६ जूनला इंग्लंडच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळण्यात येणार आहे.
जगभरातील क्रिकेट चाहते या सामन्यांकडे लक्ष लावून बसलेले आहे. मात्र, पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने आयसीसीच्या क्रिकेट विश्वचषक तसेच इतर कोणत्याही स्पर्धेत पाकशी क्रिकेट खेळू नये, अशी मागणी मोठ्या प्रमाणात भारतीयांकडून करण्यात येत आहे.
भारताच्या क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेत पाकविरुद्ध खेळाणार की नाही, यावर भारत सरकारकडून आणि बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. भारताने पाकविरुद्ध खेळण्यास नकार दिल्यास या प्रकरणात आयसीसी काय भूमिका घेते हे खूप महत्वाचे असणार आहे.