सोलापूर - क्रिकेटमध्ये पारंपारिक विरोधक असलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये आज क्रिकेट सामना रंगत आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान होणाऱ्या आजच्या सामन्यात अनेक क्रिकेटप्रेमींनी देवाला साकडे घातले आहे. पंढरपुरातील क्रिकेट प्रेमींनी भारताच्या विजयासाठी महाआरती करून विठ्ठलाला साकडे घातले.
भारताच्या विजयासाठी पंढरपुरात क्रिकेटप्रेमींचे विठ्ठलाला साकडे - cricket world cup
पंढरपुरातील क्रिकेट प्रेमींनी भारताच्या विजयासाठी महाआरती करून विठ्ठलाला साकडे घातले
भारताच्या विजयासाठी पंढरपुरात क्रिकेटप्रेमींचे विठ्ठलाला साकडे
भारत विरुध्द पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटच्या महामुकाबला मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळला जात आहे. आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान ६ वेळा आमने-सामने आले आहेत. यात सर्वच्या सर्व म्हणजे ६ वेळा भारतीय संघाने विजय मिळवला आहे.