महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी चाहत्यांसाठी 'एक' वाईट बातमी - india vs africa weather news

मागील आठवड्यात विशाखापट्टणम येथे जोरदार पाऊस झाला. आणि २ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी ८० टक्के पावसाची शक्यता आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ५० तर तिसऱ्या दिवशी ४० टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका आणि बोर्ड अध्यक्ष या संघात खेळवल्या गेलेल्या सराव सामन्यातही पाऊस पडला होता.

आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी चाहत्यांसाठी 'एक' वाईट बातमी

By

Published : Oct 1, 2019, 8:35 AM IST

विशाखापट्टणम -भारत आणि दक्षिण आफ्रिका या संघामध्ये उद्या बुधवारपासून पहिल्या कसोटी सामन्याला प्रारंभ होणार आहे. मात्र, या सलामीच्या सामन्यामध्ये पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या सामन्यापूर्वीच क्रिकेटच्या चाहत्यांचा हिरमोड होऊ शकतो.

भारतीय संघ

हेही वाचा -

मागील आठवड्यात विशाखापट्टणम येथे जोरदार पाऊस झाला. आणि २ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी ८० टक्के पावसाची शक्यता आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ५० तर तिसऱ्या दिवशी ४० टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका आणि बोर्ड अध्यक्ष या संघात खेळवल्या गेलेल्या सराव सामन्यातही पाऊस पडला होता.

बुमराह ऐवजी उमेश यादव -

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिका १-१ अशा बरोबरीत सुटली. आगामी तीन सामन्याच्या कसोटी मालिकेआधीच भारताला मोठा धक्का बसला आहे. आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेत भारताचा हुकमी गोलंदाज जसप्रीत बुमराहने माघार घेतली आहे. त्याने या मालिकेतून माघार घेतल्याने वेगवान गोलंदाज उमेश यादव याला संघात स्थान देण्यात आले आहे.

भारतीय संघ -

विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धीमान सहा, आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, शुभमन गिल.

दक्षिण आफ्रिकेचा संघ -

फाफ डू प्लेसिस (कर्णधार), टेंबा बवुमा, थेयूनिस डी ब्रुयन, क्विंटन डी कॉक, डीन एल्गार, झुबायर हम्झा, केशव महाराज, एडन मार्क्राम, सेनुरन मुथूसामी, लुंगी एनगिडी, अॅनरीच नोर्टजे, व्हेर्नोन फिलेंडर, डॅन पिएड्त, कागिसो रबाडा, रुडी सेकंड.

ABOUT THE AUTHOR

...view details