मुंबई - भारतीय क्रिकेटपटूंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. आरोपीने १६ ऑगस्ट रोजी बीसीसीआयला ई-मेल करुन धमकी दिली होती. या प्रकरणी एटीएसने ही कारवाई केली. अटक केलेल्या आरोपीचे नाव ब्रज मोहन दास असे असून त्याला आसामच्या मोरिगाव जिह्यातील शांतीपूर येथून अटक करण्यात आली आहे.
भारतीय क्रिकेटपट्टूंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक, एटीएसची कारवाई - bcci
भारतीय क्रिकेटपटूंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. आरोपीने १६ ऑगस्ट रोजी बीसीसीआयला ई-मेल करुन धमकी दिली होती. या प्रकरणी एटीएसने ही कारवाई केली. अटक केलेल्या आरोपीचे नाव ब्रज मोहन दास असे असून त्याला आसामच्या मोरिगाव जिह्यातील शांतीपूर येथून अटक करण्यात आली आहे.
भारतीय क्रिकेटपटूंना जीवे मारण्याची धमकी १६ ऑगस्टला ई-मेलद्वारे बीसीसीआयला मिळाली. तेव्हा या संदर्भात एटीएसच्या पथकाने तपास सुरू केला होता. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून, एटीएसने आसाम पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक केली. या कारवाईत पोलिसांनी आरोपीने ई- मेल करण्यासाठी वापरलेले इलेक्ट्रॉनिक साहित्य ही जप्त केले.
आसाममधील न्यायदंडाधिकारी न्यायालयातून सदर आरोपीचा ट्रान्झिस्ट रिमांड मुंबई एटीएस युनिटला मिळाला होता. तेव्हा त्याला मुंबईतील माझगाव न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने पोलिसांच्या अधिक तपासासाठी या आरोपीला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.