महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भारत-वेस्ट इंडीज दरम्यानच्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यावर पावसाचे सावट

भारत-वेस्ट इंडीज दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आजपासून सुरू होत आहे. गयानामध्ये पाऊस पडल्याने मैदान ओले आहे. त्यामुळे नाणेफेक पुढे ढकलली आहे.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली आहे.

By

Published : Aug 8, 2019, 8:57 PM IST

गयाना - भारत-वेस्ट इंडीज दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आजपासून सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना गयानातील प्रोव्हिडन्स मैदानावर खेळवला जाणार आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली आहे.

पहिल्याच सामन्यावर पावसाचे सावट आहे. स्थानिक प्रमाणवेळेनुसार सामना सकाळी साडेनऊ वाजता सुरू होणार होता. मात्र, गयानामध्ये पाऊस पडल्याने मैदान ओले आहे. त्यामुळे नाणेफेक पुढे ढकलली होती.
यापुर्वी, दोन्ही देशांदरम्यान झालेली टी-२० क्रिकेट मालिका भारताने ३-० अशी खिशात घातली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details