एंटिगा- भारत आणि वेस्टइंडिज संघात विवियन रिचर्ड्स स्टेडियमवर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दिवस अखेर भारत 3 बाद 185 धावा अशा स्थितीत आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी केलेल्या 104 धावांच्या भागिदारीच्या जोरावर भारताने सामन्यावर आपली पकड बनवली आहे. खेळ संपेपर्यंत विराट कोहली 111 चेंडूत 50 धावा आणि रहाणे 140 चेंडूत 53 धावांवर खेळत होता.
WI vs IND:कोहली आणि रहाणेच्या अर्धशतकी खेळीने भारत मजबूत स्थितीत - live score
भारत आणि वेस्टइंडिज संघात विवियन रिचर्ड्स स्टेडियमवर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दिवस अखेर भारत 3 बाद 185 धावा अशा मजबूत स्थितीत आहे.
भारताने पहिल्या डावात खेळताना 297 धावा केल्या होत्या. त्यानंतर वेस्ट इंडिजला 222 धावांवर रोखण्यात भारताला यश आले होते. पहिल्या डावात 75 धावांची आघाडी घेऊन पुढे खेळताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. भारताचे आघाडीचे फलंदाज मयंक अग्रवाल (16), लोकेश राहुल (38) आणि चेतेश्वर पुजारा (25) स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर चौथ्या स्थानी खेळायला आलेल्या विराट कोहलीने अजिंक्य रहाणे सोबत मिळून चांगली खेळी केली. सामान्यात 260 धावांची आघाडी घेतल्याने भारत सुस्थितीत आहे.