नवी दिल्ली - जानेवारी २०२० मध्ये झिम्बाब्वेचा संघ भारतीय दौऱ्यावर येणार होता. पण, आयसीसीने झिम्बाब्वे संघावर घातलेल्या बंदीचा विचार करता बीसीसीआयने झिम्बाब्वे ऐवजी श्रीलंकेला दौऱ्यासाठी आमंत्रण दिले आहे. श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डानेही भारतीय दौऱ्याची तयारी दर्शवली आहे.
जानेवारीमध्ये झिम्बाब्वेचा संघ ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतीय दौऱ्यावर येणार होता. मात्र, आयसीसीने झिम्बाब्वेवर बंदी घातल्याने बीसीसीआयने श्रीलंकेला भारतीय दौऱ्यावर येण्याचे आमंत्रण दिले आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डानेही यासाठी तयारी दाखवली आहे. त्यामुळे बुधवारी बीसीसीआयने श्रीलंकेच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे.