मोहाली - भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका संघातील दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने ७ गडी राखून विजय मिळवला. या विजयाबरोबर भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात ५२ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने नाबाद ७२ धावा करत संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. त्याच्या या नाबाद अर्धशतकी खेळीसाठी त्याला 'सामनावीर' पुरस्काराने गौरवण्यात आले.
विक्रमाचा धनी असलेला विराट सामनावीर पुरस्कार पटकावण्यातही अग्रेसर ठरला आहे. त्याने आफ्रिकेविरुध्दच्या सामन्यात सामनावीरचा पुरस्कार पटकावून पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीशी बरोबरी साधली आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट आता दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत अफगाणिस्तानचा खेळाडू मोहम्मद नबी अव्वलस्थानी आहे.
हेही वाचा -IND VS SA : हवेत सूर मारुन कर्णधार कोहलीने घेतला 'विराट' झेल, पाहा व्हिडिओ