महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

टीम इंडियाला जबर धक्का, 'या' हुकमी गोलंदाजाची कसोटी मालिकेतून माघार

भारताचा हुकमी गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या पाठीला दुखापत झाली असून यामुळे त्याने आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेतून माघार घेतली आहे. बुमराहने माघार घेतल्याने वेगवान गोलंदाज उमेश यादव याला संघात स्थान देण्यात आले आहे. भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका संघामध्ये पहिला कसोटी सामना २ ऑक्टोबरला विशाखापटण्णम येथे होणार आहे.

टीम इंडिया जबर धक्का, 'या' हुकमी गोलंदाजाने घेतली कसोटी मालिकेतून माघार

By

Published : Sep 24, 2019, 5:59 PM IST

नवी दिल्ली - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिका १-१ अशा बरोबरीत सुटली. या मालिकेनंतर २ ऑक्टोबरपासून उभय संघात कसोटी मालिका होणार आहे. तीन सामन्याच्या कसोटी मालिकेआधीच भारताला मोठा धक्का बसला आहे. आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेत भारताचा हुकमी गोलंदाज जसप्रीत बुमराहने माघार घेतली आहे.

हेही वाचा -जेव्हा धोनीने जिंकला होता पहिला विश्वचषक आणि सोबतच.. लोकांचा विश्वास

बुमराहच्या पाठीला दुखापत झाली आहे. यामुळे त्याने दक्षिण आफ्रिकेविरोधातील कसोटी मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, बुमराहने या मालिकेतून माघार घेतल्याने वेगवान गोलंदाज उमेश यादव याला संघात स्थान देण्यात आले आहे. भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका संघामध्ये पहिला कसोटी सामना २ ऑक्टोबरला विशाखापटण्णम येथे होणार आहे. बुमराहने माघार घेतल्याने भारतासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

हेही वाचा -सुपर ओव्हरच्या नियमात बदल...असा ठरणार विजेता


भारताचा कसोटी संघ -
विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृध्दीमान साह (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा आणि शुभमन गील.

ABOUT THE AUTHOR

...view details