विशाखापट्टणम - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुचर्चित 'स्वच्छ भारत मोहिमे'ला टीम इंडियाने पाठिंबा दिला. टीम इंडियाची आजपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ सामन्यांची कसोटी मालिका सुरु असून या मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टणममध्ये सुरु आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघातील खेळाडूंनी त्यांच्या जर्सीवर स्वच्छ भारत मोहिमेचं स्टिकर लावून या मोहिमेला पाठिंबा दर्शविला.
हेही वाचा -रोहित शर्मा : आयसीसीच्या क्रिकेट इतिहासात 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू
आज देशासह जगभरात २ ऑक्टोबर हा दिवस महात्मा गांधींची १५० वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. याच पार्श्वभूमिवर टीम इंडिया स्वच्छ भारत मोहिमेला समर्थन करत मैदानात उतरली. बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर, खेळाडूंनी त्यांच्या जर्सींच्या बाह्यांवर मोहिमेचा लोगो लावलेल्या जर्सीचा फोटो शेअर केला आहे.
या फोटोसोबत बीसीसीआयने ' महात्मा गांधींच्या १५० व्या जयंती दिवशी स्वच्छता क्रांतीला ५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने भारतीय संघ पुन्हा स्वच्छ भारत अभियानात सामील झाला. अशा आशयाचा मजकूर ट्विट केला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडिया स्वच्छ भारत अभियान आणि फिट इंडिया मोहिमेत सहभागी झाली असल्याची घोषणा केली होती.
हेही वाचा -कसोटी : सलामीवीर म्हणून शतकी ठोकणारा रोहित चौथा; १, २, ३ कोण आहेत वाचा...