नवी दिल्ली - टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुध्द विशाखापट्टणच्या मैदानात पहिला कसोटी सामना खेळत आहे. भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला पहिल्यादांच उतरलेल्या रोहित शर्माने नाबाद शतकी खेळी करत पहिला दिवस गाजवला. रोहितने १२ चौकार आणि ५ षटकाराच्या साह्याने नाबाद ११५ धावांनी खेळी केली. सलामीच्या सामन्यात भारताकडून शतक ठोकणारा रोहित चौथा फलंदाज ठरला. यापूर्वी आणखी तीन भारतीय क्रिकेटपटूंनी सलामीच्या पहिल्याच सामन्यात शतकी खेळी केली आहे. वाचा कोण आहेत ते खेळाडू....
हेही वाचा - रोहित शर्मा : आयसीसीच्या क्रिकेट इतिहासात 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू
शिखर धवन -
आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात, शिखर धवनने सलामीला उतरत शतकी खेळी केली होती. धवन आपला पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलिया विरोधात मोहालीच्या मैदानात खेळला आहे. या सामन्यात धवनने १७४ चेंडूत १८७ धावांची दणकेबाज खेळी केली होती. महत्वाचे म्हणजे, धवनने या खेळीत २ षटकार आणि तब्बल ३३ चौकार मारले होते.