टीम इंडियाला आता फक्त आजीची प्रार्थनाच वाचवू शकते; मीम्स व्हायरल - ind-vs-nz
भारतीय खेळाडूंच्या खेळीवर सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.
टीम इंडियाला आता फक्त आजीची प्रार्थनाच वाचवू शकते; मीम्स व्हायरल
नवी दिल्ली- आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर २४० धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव किवीच्या वेगवान आक्रमणासमोर गडगडला. भारतीय संघाची अवस्था ९.६ षटकात ४ गडी बाद २४ अशी झाली. तेव्हा भारताच्या खेळीवर सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.