महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IND vs ENG: शिखर धवन 'या' विक्रमांपासून ९४ धावा दूर - dhawan can make 2 records in 2nd odi

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचा डावखुरा सलामीवीर शिखर धवन याला दोन मोठे विक्रम आपल्या नावे करण्याची संधी आहे. धवनने आतापर्यंत १४० एकदिवसीय सामन्यात खेळताना ४५.४३ च्या सरासरीने ५ हजार ९०६ धावा केल्या आहेत. त्याला ६ हजाराचा टप्पा गाठण्यासाठी ९४ धावांची गरज आहे.

ind-vs-eng-shikhar-dhawan-can-make-two-big-records-in-second-odi
IND vs ENG: शिखर धवन 'या' विक्रमांपासून ९४ धावा दूर

By

Published : Mar 24, 2021, 5:53 PM IST

मुंबई - इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचा डावखुरा सलामीवीर शिखर धवन याला दोन मोठे विक्रम आपल्या नावे करण्याची संधी आहे. धवनने आतापर्यंत १४० एकदिवसीय सामन्यात खेळताना ४५.४३ च्या सरासरीने ५ हजार ९०६ धावा केल्या आहेत. त्याला ६ हजाराचा टप्पा गाठण्यासाठी ९४ धावांची गरज आहे. त्याने जर हा टप्पा गाठला तर तो अशी कामगिरी करणारा जगातील ६२ वा तर भारताचा दहावा खेळाडू ठरेल.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६ हजार किंवा त्याहून अधिक धावा करणारे भारतीय खेळाडू -

  • सचिन तेंडुलकर (१८४२६)
  • विराट कोहली (१२०९६)
  • सौरव गांगुली (११२२१)
  • राहुल द्रविड़ (१०७६८)
  • महेंद्रसिंह धोनी (१०५९९)
  • मोहम्मद अझरुद्दीन (९३७८)
  • रोहित शर्मा (९१४८)
  • युवराज सिंह (८६०९)
  • विरेंद्र सहवाग (७९९५)

याशिवाय, धवनने जर ९४ धावा केल्या तर तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये जलद ६ हजार धावांचा टप्पा गाठणारा जगातील तिसरा आणि भारताचा दुसरा खेळाडू ठरेल. शिखरने आतापर्यंत १३७ डावात फलंदाजी केली आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ६ हजार धावा करणारे जगातील खेळाडू -

  • हाशिम अमला (दक्षिण अफ्रिका) - १२३ डावात
  • विराट कोहली (भारत) - १३६ डावात
  • केन विल्यम्सन (न्यूझीलंड) - १३९ डावात
  • व्हिवियन रिचर्ड्स (वेस्ट इंडीज) - १४१ डावात
  • सौरव गांगुली (भारत) - १४७ डावात

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 6 हजार धावांचा टप्पा गाठणारे भारतीय खेळाडू -

  • विराट कोहली - १३६ डावात
  • सौरव गांगुली - १४७ डावात
  • रोहित शर्मा - १६२ डावात
  • महेंद्रसिंह धोनी - १६६ डावात
  • सचिन तेंडुलकर - १७० डावात

ABOUT THE AUTHOR

...view details