महाराष्ट्र

maharashtra

जसप्रीत बुमराहला विश्रांती मिळण्याची शक्यता

By

Published : Feb 17, 2021, 6:38 AM IST

चेपाक येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात बुमराहला विश्रांती देण्यात आली होती. या कसोटीत भारताने इंग्लंडवर ३१७ धावांनी विजय मिळवला. आता बुमराह पुढील दोन कसोटी सामने खेळणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरीत गाठण्यासाठी भारताला बुमराहकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

जसप्रीत बुमराह
जसप्रीत बुमराह

नवी दिल्ली - भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला वर्क मॅनेजमेंट प्रोग्राम अंतर्गत इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेतून विश्रांती दिली जाऊ शकते. दोन्ही संघांमधील मर्यादित षटकांचे आठ सामने मार्चमध्ये खेळले जातील.

चेपाक येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात बुमराहला विश्रांती देण्यात आली होती. या कसोटीत भारताने इंग्लंडवर ३१७ धावांनी विजय मिळवला. आता बुमराह पुढील दोन कसोटी सामने खेळणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरीत गाठण्यासाठी भारताला बुमराहकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

हेही वाचा - Australian Open : जोकोव्हिच नवव्यांदा उपांत्य फेरीत

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "जसप्रीतने ऑस्ट्रेलियन दौऱ्याच्या सुरूवातीपासूनच १८० षटके फेकली आहेत. चार कसोटी सामन्यांमध्ये त्याने जवळपास १५० षटके गोलंदाजी केली आहेत. याशिवाय त्याने मैदानावर बरेच तास काढले आहेत. त्यामुळे मर्यादित षटकांच्या मालिकेमध्ये त्याला विश्रांती देणे गरजेचे आहे.''

रविचंद्रन अश्विनने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली होती आणि तो राहुल द्रविड (२०११ इंग्लंड मालिका) सारखा एकदिवसीय क्रिकेटमध्ये परतणार का हे पाहणे गरजेचे आहे. त्यावेळी द्रविड कसोटी संघात उत्तम कामगिरी केल्यामुळे तीन वर्षांनंतर एकदिवसीय संघात परतला होता. मात्र त्या मालिकेनंतर द्रविडने निवृत्तीची घोषणा केली. अश्विनसोबतच आगामी टी-२० वर्ल्डकपचे ध्येय समोर ठेऊन मुंबईचा प्रतिभावान फलंदाज सूर्यकुमार यादव यांचे नावही चर्चेत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details