कोलकाता - भारतात उद्यापासून ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. पहिल्यांदाच भारतात दिवस-रात्र कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यांच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे.
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओत आम्ही ऐतिहासिक सामन्यासाठी सज्ज आहोत. तुम्ही सज्ज आहात का ? असा प्रश्न भारतीय संघातील खेळाडू विचारत आहेत.
उद्यापासून (शुक्रवार) भारत आणि बांगलादेश संघातील कसोटीला ईडन गार्डन्स मैदानावर सुरुवात होईल. या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे. कारण भारतीय संघ सर्वच आघाड्यावर चांगली कामगिरी करताना दिसत आहे. तर दुसरीकडे बांगलादेशचा संघ भारतीय संघासमोर कमकुवत दिसत आहे.