महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Ind vs Aus : भारताला धूळ चारण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा खास सराव, जाणून घ्या...

भारतामध्ये दवाचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे सामन्याचा कल बदलू शकतो. ही बाब ओळखून ऑस्ट्रेलिया संघाने चेंडू ओला करून सराव करायला सुरुवात केली आहे.

ind vs aus : australia cricket team doing special practice to defeat team india on odi series 2020
Ind vs Aus : भारताला धूळ चारण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा खास सराव, जाणून घ्या...

By

Published : Jan 12, 2020, 7:46 PM IST

मुंबई - भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात दाखल झाला आहे. भारताला त्यांच्याच मातीत धूळ चारण्यासाठी, ऑस्ट्रेलियाचा संघ सज्ज झाला असून त्यासाठी त्यांनी कसून सराव केला.

सराव करताना ऑस्ट्रेलियाचे खेळाडू...

भारताला त्यांच्या मातीत २०१९ या सालात धूळ चारणे अनेक संघाना जमले नाही. वर्षाच्या शेवटी भारताने दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, त्यानंतर श्रीलंकेला धूळ चारली. आता भारतीय संघ ऑस्ट्रेलिया संघासोबत दोन हात करणार आहे. उभय संघात ३ सामन्याची मालिका खेळवण्यात येणार असून या मालिकेसाठी दोनही संघ सज्ज झाले आहेत.

भारतीय संघाची गणना सद्य घडीला जगातील बलाढ्य संघात केली जाते. तसेच भारतातील खेळपट्ट्या आणि वातावरण यांचा अंदाज लवकर विरोधी संघाला येत नाही. या कारणाने भारताला त्यांच्या मातीत पराभूत करणे कठिण बनले आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाने भारताला त्यांच्या मातीत हरवण्यासाठी खास सराव केला.

भारताविरुद्ध रणणिती आखताना ऑस्ट्रेलियन संघ...

भारतामध्ये दवाचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे सामन्याचा कल बदलू शकतो. ही बाब ओळखून ऑस्ट्रेलिया संघाने चेंडू ओला करून सराव करायला सुरुवात केली आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक -

  1. १४ जानेवारी - मुंबई
  2. १७ जानेवारी - राजकोट
  3. १९ जानेवारी - बंगळुरू
  • ऑस्ट्रेलियाचा संघ -
  • अ‍ॅरोन फिंच (कर्णधार), डी'आर्सी शॉर्ट, अ‍ॅश्टन अ‍ॅगर, अ‍ॅलेक्स करी (यष्टिरक्षक), पॅट कमिन्स, पीटर हँड्सकोम्ब, जोश हेझलवूड, मार्नस लाबुशेन, केन रिचर्डसन, स्टिव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, अ‍ॅश्टन टर्नर, डेव्हिड वॉर्नर आणि अ‍ॅडम झम्पा.
  • भारतीय संघ -
  • विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर आणि जसप्रीत बुमराह.

ABOUT THE AUTHOR

...view details