लंडन -विश्वकरंडक स्पर्धेच्या सलामीच्याच सामन्यात एक मोठा विक्रम पाहायला मिळाला. खेळल्या जात असलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून यजमान इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. या सामन्यात दिग्गज फिरकीपटू इम्रान ताहीरने एक मोठा विक्रम आपल्या नावावर करत इतिहास रचला आहे.
विश्वकरंडक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात इम्रान ताहीरने रचला इतिहास
अशी कामगिरी करणारा इम्रान हा पहिलाच फिरकीपटू तर क्रिकेटविश्वातला दुसरा गोलंदाज ठरला आहे
इम्रान ताहीर
आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसने फिरकीपूट इम्रान ताहीरच्या हातात पहिलेच षटक सोपवले, आणि ताहीरने त्याचा विश्वास सार्थ ठरवत आपल्या पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर सलामीवीर जॉनी बेअरस्टोला माघारी धाडले. अशी कामगिरी करणारा इम्रान हा पहिलाच फिरकीपटूतर क्रिकेटविश्वातला दुसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी 1992च्या विश्वकरंडक स्पर्धेत असा विक्रम करण्यात आला होता.