मुंबई - भारतात संध्या इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) थरार चालू आहे. ही स्पर्धा संपल्यानंतर भारताला एकदिवसीय विश्वचषकाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय एकदिवसीय संघाचा उपकर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने ३० मे पासून इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरू होणाऱ्या विश्वचषकापूर्वी भारताच्या संघ निवडीबाबत आपले मत वक्त केले आहे.
रोहितच्या मतानुसार आयपीएलमध्ये खेळाडूंनी केलेल्या कामगिरीवरून वर्ल्डकपसाठी संघनिवड होता कामा नये. आयपीएलमध्ये चांगल्या प्रदर्शनामुळे फलंदाजांमध्ये धावा करण्याचा आत्मविश्वास वाढू शकतो. मात्र, यातुन प्रतिभेची निवड करणे शक्य नाही. कारण टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेट हे पूर्णपणे वेगळे असल्याचे मत रोहितने व्यक्त केले आहे.