लंडन- अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत न्यूझीलंडने वेस्ट इंडिजवर अवघ्या ५ धावांनी मात करत विजय मिळवला. या विजयामुळे न्यूझीलंड टीम वर्ल्ड कपच्या १२ व्या सीझनमध्ये अव्वलस्थानी पोहोचले आहे.
ICC WC 2019 : चुरशीच्या लढतीत न्यूझीलंडचा विंडीजवर ५ धावांनी विजय - NEW ZEALAND
अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत न्यूझीलंडने वेस्ट इंडिजवर अवघ्या ५ धावांनी मात करत विजय मिळवला. या विजयामुळे न्यूझीलंड टीम वर्ल्ड कपच्या १२ व्या सीझनमध्ये अव्वलस्थानी पोहोचले आहे.
या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत निर्धारीत ५० षटकात ८ बाद २९१ धावा केल्या. कर्णधार केन विलियमसनने १५४ चेंडूत १४८ धावांची खेळी केली. एका बाजूने विकेट जात असताना केनने एक बाजू धरत सन्मानजनक धावसंख्या उभारली. तर वेस्ट इंडिजकडून या सामन्यात शेल्डन कॉट्रेल याने सर्वाधिक ४ बळी घेतले.
तर न्यूझीलंडने दिलेल्या 292 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात अडखळती झाली. न्यूझीलंडने दिलेल्या २९२ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात अडखळती झाली. मात्र, तुफानी शतकी खेळी करताना कार्लोस ब्रेथवेटने लढतीत रंगत आणली होती. शतक पूर्ण केल्यानंतर ब्रेथवेटने मारलेला एक उत्तुंग फटका ट्रेंट बोल्टने सीमारेषेनजीक टिपला आणि न्यूझीलंडला ५ धावांनी रोमहर्षक विजय मिळवून दिला.