लंडन - भारत विरुध्द पाकिस्तनचा सामना म्हणलं की क्रिकेट रसिकांमध्ये उत्साह, जोश पाहायला मिळतो. विश्वकरंडक स्पर्धेत भारत पाकिस्तानच्या संघात सामना झाला. यासामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार ८९ धावांनी विजय मिळवला. त्यानंतर आता, फक्त एकदा...आणि एकदाच....पुन्हा भारत विरुध्द पाक सामना होण्याची शक्यता...वाचा सविस्तर...
भारत विरुध्द पाकिस्तानचा सामना पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेट रसिकांच्या उड्या पडतात. या सामन्याचा 'टीआरपी'ही विश्वकरंडक सामन्याच्या अंतिम सामन्यापेक्षा जास्त असल्याचे अनेक वेळा दिसून आला आहे. आत्तापर्यत भारत विरुध्द पाकिस्तान सामना विश्वकंरडक स्पर्धेच्या इतिहासात ७ वेळा झाला. यात सातही वेळा भारताने पाकिस्तानला धूळ चारली. लंडनमध्ये सुरु असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेतत भारत विरुध्द पाकिस्तान सामन्यात भारताने पाकचा डकवर्थ लुईसच्या नियमानुसार ८९ धावांनी एकतर्फी पराभव केला. याच स्पर्धेत जर-तरची गणिते जुळून आली तर भारत विरुध्द पाकचा सामना क्रिकेट रसिकांना पुन्हा पाहयला मिळू शकतो.
भारत विरुध्द पाकिस्तान थरार.... विश्वकरंडक स्पर्धेत भारताने जवळपास उपांत्य फेरी गाठल्यात जमा आहे. भारताला राहिलेल्या पुढील ३ सामन्यात एक विजय मिळवावा लागणार आहे. तर उलट पाकिस्तानच्या संघाला राहिलेल्या दोन सामन्यात म्हणजे अफगाणिस्तान आणि बांगलादेशचा पराभव करावा लागणार आहे. जरी हे दोन्ही सामने पाकने जिंकले तरी इंग्लड विरुध्द भारतच्या सामन्यात भारताच्या विजयाची प्रार्थना पाकिस्तानला करावी लागणार आहे.
ICC WC २०१९ : भारत विरुध्द पाकिस्तान थरार....दोन्ही संघ उपांत्य फेरीत पुन्हा भिडणार? अशी आहेत समीकरणे अशी गणिते जुळली तर भारत विरुध्द पाकिस्तान सामना होणार -
- भारताने राहिलेले तीनही सामने जिंकावे. त्यामुळे भारतीय संघ १७ गुणांसह गुणातालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचेल.
- पाकिस्तानचा संघ उर्वरित दोन्ही सामने जिंकला तर त्यांचे ११ गुण होतील आणि पाकचा संघ चौथ्या क्रमांकावर राहिल.
- मग गुणातालिकेत प्रथम क्रमांक असलेल्या संघाला चौथ्या संघाशी खेळावे लागेल. म्हणजे भारत जर गुणातालिकेत प्रथम क्रमांकावर पोहोचला तसेच पाक संघ चौथ्या क्रमांकावर आला तर या दोन्ही संघात उपांत्य सामना होऊ शकतो.
- भारताने राहिलेल्या तीन सामन्यांपैकी इंग्लड विरुध्दचा सामना सोडून एक सामना गमावला तर भारताचे १५ गुण होतील. जर ऑस्ट्रेलियाने राहिलेले दोन्ही सामने जिंकले तर त्यांचे १६ गुण झाल्याने ते गुणातालिकेत अव्वल ठरतील.
- तर दुसरीकडे पाकिस्तानने पाकिस्तानचा संघ उर्वरित दोन्ही सामने जिंकला तर त्यांचे ११ गुण होतील आणि पाक चौथ्या क्रमांकावर राहिल.
- जर असे झाल्यास भारताला तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंड विरुध्द खेळावे लागेल. आणि पाकिस्तानला पहिल्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाशी दोन हात करावे लागेल.
- त्यानंतर जर भारताने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आणि दुसरीकडे पाकिस्तानने अव्वल असलेल्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन अंतिम फेरी गाठली तर पुन्हा भारत विरुध्द पाक विश्वकरंडकासाठी भिडतील.
- या सर्वांमध्ये मुख्य बाब म्हणजे, इंग्लडचा संघ राहिलेला दोन सामन्यापैकी एक सामना हरला पाहिजे आणि पाकिस्तानचा संघ दोन्ही सामना जिंकला पाहिजे. त्यावर पुढील गणिते ठरतील.
पाकिस्तानचा संघ आनंद साजरा करताना....
बेभरवशाच्या पाकची अनपेक्षित भरारी
पाकिस्तानचा आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजकडून दारुण पराभव झाला. त्यानंतर पाक संघावर कडाडून टीका झाली. तेव्हा पाकिस्तानच्या संघाने विश्वकरंडक विजेतेपदाचे दावेदार यजमान इंग्लडचा १४ धावांनी पराभव केला. श्रीलंकेविरुध्दचा तिसरा सामना पावसाअभावी झाला नाही. चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ४१ धावांनी पराभव केला. त्यानंतर भारत विरुध्दच्या हाय व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमाने ८९ धावांनी पाणी पाजलं.
भारताकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानच्या संघावर कडाडून टीका झाली. काही चाहत्यांनी तर पाकिस्तानी खेळाडूंना शिवीगाळ केली. तेव्हा पाकच्या खेळाडू सगळ झुगारुन नव्या उमेदीने मैदानात उतरले. पुढील सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि विश्वकरंडकाचे दावेदार समजल्या जाणाऱ्या न्यूझीलंडचा पराभव केला. त्यानंतर पाक आज अफगाणिस्तान आणि बांगलादेश विरुध्द ५ जुलैला दोन हात करणार आहे.
भारतीय संघ आनंद साजरा करताना..... भारत अंजिक्य.....
भारतीय संघाने या स्पर्धेत पहिला सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ६ विकेट राखून पराभव केला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा ३६ धावांनी पराभव करत आम्ही विश्वकरंडकाचे दावेदार असल्याचा दावा केला. तिसरा न्यूझीलंड विरुध्द सामना पावसाअभावी होऊ शकला नाही. त्यानंतर चौथ्या सामन्या कट्टर प्रतिस्पर्धी पाकला डकवर्थ लुईस नियमाने ८९ धावांनी धुळ चारली. त्यानंतर चांगली लढत दिलेल्या अफगाणिस्तानचा रंगतदार सामन्यात ११ धावांनी पराभव केला. त्यानंतर सहाव्या सामन्यात वेस्ट इंडिजचा १२५ धावांनी एकतर्फी पराभव केला.