ब्रिस्बेन- आयसीसी महिला टी-२० विश्व करंडक स्पर्धेला २१ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. याआधी सर्व संघामध्ये सराव सामने खेळवण्यात येत आहे. आज यातील पाचवा सामना भारत-पाकिस्तान यांच्यात खेळवण्यात येणार होता. पण हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे.
ब्रिस्बेनच्या अॅलन बॉर्डर स्टेडियममध्ये या सामन्याला सकाळी ९ वाजता सुरूवात होणार होती. पण पावसामुळे मैदान ओले झाले होते. यामुळे मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचाशी चर्चा करुन सामना रद्द करण्यात आल्याची घोषणा केली. या सामन्यात नाणेफेकसुद्धा करण्यात आली नाही.
दरम्यान पाकिस्तानविरुद्धचा सामना रद्द झाल्याने चाहते निराश झाले आहेत. कारण भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमी हायव्होल्टेज ठरतो. भारतीय संघ या सामन्याद्वारे टी-२० विश्व करंडकात विजयी शुभांरभ करण्यास उत्सुक होता.
भारतीय महिला संघ -
- हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमाह रोड्रिग्स, हरलीन देओल, वेदा कृष्णमूर्ति, तान्या भाटिया, दीप्ति शर्मा, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, पूनम यादव, राधा यादव, अरुंधति रेड्डी आणि रेड्डी यादव.