लीड्स- आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर संथ खेळी केल्याने टीका होत आहे. काहींनी तर धोनीने निवृत्ती घ्यायला हवी असा सल्ला दिला. मात्र, आज श्रीलंकेविरुध्दच्या सामन्यात पुन्हा धोनी किती महत्त्वाचा खेळाडू आहे, हे दिसून आले. त्याने या सामन्यात यष्टीरक्षण करताना यष्टीमागे चार बळी घेतले.
धोनीची 'कमाल' लंका 'बेहाल'..यष्टीमागे मिळवले 4 बळी - sri lanka
धोनीने आजच्या सामन्यात यष्टीमागे करुणारत्ने, कुशल परेरा आणि अविष्का फर्नांडो यांना झेल बाद केले. तर कुशल मेंडीसला यष्टीचीत केले.
क्रिकेटविश्वात महेंद्रसिंह धोनी हा जगातला महान फिनिशर म्हणून ओळखला जातो. तो आपल्या संघाच्या विजयासाठी सर्वोपरी प्रयत्न करत असतो. सद्या त्याची बॅट तळपत नसल्याने त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. मात्र, तो मैदानात असला की विरोधी संघाच्या खेळाडुंमध्ये धडकी भरते हे अनेक वेळा सिध्द झाले आहे. त्याने आज यष्टीरक्षणात कमाल करताना श्रीलंकेच्या चार खेळाडूंना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
धोनीने आजच्या सामन्यात यष्टीमागे करुणारत्ने, कुशल परेरा आणि अविष्का फर्नांडो यांना झेलबाद केले. तर कुशल मेंडीसला यष्टिचीत केले. तसेच धोनीचा रिव्हू हा भारतीय संघासाठी मिळालेल्या 'एक्ट्रा' बोनस रिव्हू आहे. त्याने घेतलेले रिव्हू हे अनेकवेळा यशस्वी ठरलेले आहेत.