मुंबई- रांची येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ नियमित कॅप ऐवजी विशेष आर्मीची कॅप घालून मैदानात उतरला होता. भारत अशा प्रकारे आर्मीची कॅप घालून राजकारण करत आहे, असा आरोप करत पाकिस्तानने आयसीसीकडे भारतावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आर्मी कॅप घातल्याबद्दल भारतावर आयसीसीने कारवाई करावी - पाकिस्तान - पुलवामा
भारतीय संघ नियमित कॅप ऐवजी विशेष आर्मीची कॅप घालून मैदानात उतरला होता. भारत अशा प्रकारे आर्मीची कॅप घालून राजकारण करत आहे, असा आरोप करत पाकिस्तानने आयसीसीकडे भारतावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी म्हणाले, भारताने नियमित कॅप ऐवजी आर्मीची विशेष कॅप परिधान केली. हे सर्वांनी पाहिले आहे. आयसीसीने याला बघितले नाही का?, आम्हाला असे वाटते की पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यावर लक्ष घालून देण्याऐवजी आयसीसीने स्वत: याबाबत कारवाई केली पाहिजे. कुरेशी यांनी फवाद खान यांच्या ट्वीटला समर्थन देताना म्हटले, की भारतीय संघाने राजकारण थांबवले नाहीतर, काश्मिरमध्ये भारताकडून होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ पाकिस्तानचा संघनेही काळ्या फिती बांधून मैदानात उतरले पाहिजे.
पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांच्या सन्मानाप्रती भारतीय संघाने शुक्रवारी झालेल्या सामन्यात आर्मीच्या कॅप परिधान केल्या होत्या. यासोबत सामन्याचे मानधन राष्ट्रीय सुरक्षा दलाला दान दिले होते.