मुंबई- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रांची येथे तिसरा एकदिवसीय सामना झाला होता. या सामन्यात भारतीय संघाने पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यासाठी आर्मीच्या विशेष कॅप्स घातल्या होत्या. भारताने आर्मीच्या कॅप्स परवानगीशिवाय घातल्या आहेत, असा आरोप करत पाकिस्तानने भारतावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
भारताला आर्मी कॅप घालण्याची परवानगी होती; पाकिस्तान पडला तोंडावर
भारताने आर्मीच्या कॅप्स परवानगीशिवाय घातल्या आहेत, असा आरोप करत पाकिस्तानने भारतावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
पाकिस्तानने भारतावर कारवाई करण्यासाठी आयसीसीकडे पत्राद्वारे तक्रार केली होती. पाकिस्तानच्या या आरोपावर आयसीसीचे महाप्रबंधक क्लॅरी फ्लोर्लोग यांनी उत्तर देताना स्पष्ट केले, की बीसीसीआयने हुतात्मा झालेल्या सैनिंकासाठी पैसे जमवण्यासाठी आर्मीची विशेष कॅप घालण्याची मागणी केली होती. आयसीसीने या मागणीला मान्यता दिली होती.
आयसीसीच्या स्पष्टीकरणानंतर पाकिस्तान तोंडावर पडला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख एहसान मनी यांनी रविवारी म्हटले होते, की भारताने दुसऱया कारणासाठी परवानगी घेतली होती. त्याचा दुरुपयोग केला जात आहे. हे स्वीकाहार्य नाही.