मँचेस्टर- आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेमध्ये आज यजमान इंग्लड विरुध्द अफगाणिस्तानचा सामना होत आहे. एकीकडे इंग्डला हा सामना जिंकून उपांत्य फेरीची दावेदारी भक्कम करावयाची आहे. तर दुसरीकडे सलग चार पराभवांना सामोरे जावे लागणाऱ्या अफगणिस्तानला गुणतालिकेत गुणाचे 'खाते' उघडण्याचे आव्हान असेल. दरम्यान, हा सामना अफगाणिस्तानसाठी कठीण असणार आहे.
अफगाणिस्तानला धूळ चारुन उपांत्य फेरीची दावेदारी निश्चित करण्याचे इंग्लडचे लक्ष्य - ICC cricket world cup 2019
आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेमध्ये आज यजमान इंग्लड विरुध्द अफगाणिस्तानचा सामना होत आहे. एकीकडे इंग्डला हा सामना जिंकून उपांत्य फेरीची दावेदारी भक्कम करावयाची आहे. तर दुसरीकडे सलग चार पराभवांना सामोरे जावे लागणाऱ्या अफगणिस्तानला गुणतालिकेत गुणाचे 'खाते' उघडण्याचे आव्हान असेल.
अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाला सुरू असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेमध्ये आपला ठसा उमटवता आलेला नाही. त्यांना सलग चार पराभवांना सामोरे जावे लागले आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांना आज यजमान इंग्लंडचा सामना करावयाचा आहे. इंग्लंडने ४ लढतींमधून तीन विजयांसह ६ गुणांची कमाई केली असून इंग्लड चौथ्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे.
अफगाणिस्तान लढतीआधी इंग्लंडचा प्रमुख खेळाडू जेसन रॉयला दुखापत झाली असून यामुळे त्याला आगामी २ सामन्यांमधून माघार घ्यावी लागली आहे. कर्णधार मॉर्गनलाही दुखापतीमुळे बाहेर जावे लागले आहे.