दुबई - अतिशय थरारक आणि शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंग्लडने न्यूझीलंडचा पराभव केला आणि क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच विश्वकरंडकावर नाव कोरले. मात्र, या सामन्यात घटलेल्या सुपर ओव्हरच्या थरारनाट्यानंतर, आयसीसीवर चौफेर टीका झाली. आता याच नियमात आयसीसीने बदल केला आहे.
हेही वाचा -मोठी बातमी!..आयसीसीकडून झिम्बाब्वे संघाचे निलंबन मागे, 'हा' संघही झाला सदस्य
'जर एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या गटसाखळीच्या सामन्यात सुपर ओव्हर टाय झाली तर सो सामना टाय होईल. उपांत्य आणि अंतिम फेरीचा सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. ही सुपर ओव्हरही टाय झाली तर पुन्हा ती खेळवण्यात येईल. जोपर्यंत सामन्याचा निकाल लागत नाही, तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवली जाईल', असे आयसीसीच्या नवीन नियमात ठरवले गेले आहे.
आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दिलेल्या या चार धावांच्या ओव्हरथ्रोवर खूप वादविवाद झाले होते. या धावा दोन्ही संघांच्या निर्णयावर परिणाम करु शकल्या असत्या. त्यावेळी उपस्थित पंच कुमार धर्मसेनाने यांनी सहा धावा इंग्लंडला दिल्या होत्या. या विवादानंतर, धर्मसेना यांनी आपली चूक मान्य केली होती.
सामन्याच्या शेवटच्या ५० व्या षटकात इंग्लंडला विजयासाठी तीन चेंडूत ९ धावांची गरज होती. तेव्हा या षटकाच्या चौथ्या चेंडूवर २ धाव घेण्याचा प्रयत्नात असलेल्या बेन स्टोक्सला बाद करण्यासाठी गुप्टीलने थ्रो केला. तो थ्रो स्टोक्सच्या बॅटला लागून सीमारेषेबाहेर गेला. त्यामुळे पंचानी इंग्लंड एकूण ६ धावा दिल्या. त्यामुळे हा सामना बरोबरीत सुटला.
आयसीसीचा आधीचा नियम -
सुपर ओव्हरमध्येही सामना जर टाय झाला तर दोन्ही संघांपैकी कोणी जास्त चौकार लगावले आहेत (पूर्ण डावात आणि सुपर ओव्हरमध्ये) ते पाहिले जाते. सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना दोन चौकार लगावले, तर न्यूझीलंडला एकही चौकार लगावता आला नाही. संपूर्ण सामन्यात न्यूझीलंडपेक्षा इंग्लडने जास्त चौकार लगावले होते. त्यामुळे इंग्लंडला जास्त चौकार लगावल्यामुळे विश्वविजेता घोषित करण्यात आले.